एक्स्प्लोर
Advertisement
नागरिक, कोरोना आणि टक्कल... कटिंगची दुकानं बंद असल्यानं घरच्या घरी टक्कल करण्यावर जोर
कोरोनोमुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेरच निघायचे नसल्याने अनेकांनी घरच्या घरीच केले टक्कल केले आहे. केसांची होत असलेली वाढ व लॉकडाऊनमुळे केसकर्तनालयं बंद आहेत. त्यामुळं अनेकांनी घरीच टक्कल करण्याला प्राधान्य दिलं आहे.
बारामती : एरवी केसांची निगा राखण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अनेक जण मोठ-मोठ्या सलूनमध्ये तासनतास वेळ घालवत आपल्या केसांची निगा घेत केस कापत असतात. वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईल करून समाजात वावरत असतात. पण सध्या कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला असल्यामुळे आपल्या देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र या दरम्यान केशकर्तनालय (hair cutting salon) सुद्धा बंद असल्याने नागरिकांची चांगलीच हेळसांड होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या सर्व नागरिकांना प्रशासनाने घरात बसण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु लहानांपासून ते वयोवृद्धांच्या जीवनशैलीचा भाग असणारे सलून ( केस कर्तनालय) बंद असल्याने नागरिकांची पुरती धांदल उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सध्या ग्रामीण भागात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये सलूनची दुकाने बंद असल्यामुळे नागरिक इलेक्ट्रॉनिक मशीन खरेदी करून त्या मशिनच्या साहाय्याने आपल्या डोक्यावरचे केस घरच्या घरीच काढत आहेत.
तसेच काही जण घरीच कात्रीच्या साहाय्याने कटिंग करताना दिसत आहेत. यामध्ये लहान बालके, शालेय विद्यार्थी, नोकरदार, मध्यमवर्गीय, वयस्कर यांचाही समावेश आहे. त्यात एखादा सलूनवाला घरी बोलावला तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे सलूनवाल्याला न बोलवता घरच्या घरी, घरच्या माणसांकडून लोक डोक्यावरील केस काढताना दिसत आहेत.
पुढील काही दिवस घरातून बाहेर पडायचे नाही. कार्यालयात वा कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहायचे नसल्याने लोक निर्धास्तपणे आपल्या डोक्यावरचे सर्व केस काढून टाकत आहेत. दुसरीकडे उन्हाळा वाढू लागल्याने लोकं आता या काढून टाकलेल्या उजडे चमन वरून हात फिरवताना दिसत आहेत. एरवी टक्कल कर म्हटले तरी अनेकजण नकार करत असतात. केसांच्या स्टाईलमुळे समाजात त्यांचा दिसण्याचा एक वेगळाच रुबाब असतो. त्यामुळे लोक फक्त धार्मिक पूजा किंवा विधीला टक्कल केल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र लॉकडाऊनमुळे घरातच बसावे लागत आहे. या दरम्यान केसांची वाढ तर होत आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या घरीच घरच्या लोकांकडून डोक्यावरील केस काढून डोक्यालाही एक प्रकारचा आराम दिल्याचे दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement