LIVE UPDATES | एटापल्ली तालुक्यातील हेलडलमी जंगलात पोलीस, नक्षल चकमक, एक नक्षली ठार,
मुंबई : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान आज देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या 20 हजाराने वाढली आहे. देशात गेल्या 24तासांत कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 903 ने वाढली तर मृतांचा आकडा 379 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6 लाख 25 हजार 544 झाला आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 79 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 60.72 टक्के आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 32 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 2 लाख 27 हजार 439 इतके आहेत. देशात एकूण कोरोनामुळं मृतांची संख्या 18 हजार 213 झाली आहे. 20 जुलै पर्यंत देशात 92 लाख 97 हजार 749 चाचण्या झाल्या आहेत. कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Background
मुंबई : जगभरातील अनेक वैज्ञानिक या व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान आज देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या 20 हजाराने वाढली आहे. देशात गेल्या 24तासांत कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 903 ने वाढली तर मृतांचा आकडा 379 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6 लाख 25 हजार 544 झाला आहे.
त्यापैकी एकूण 3 लाख 79 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 60.72 टक्के आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 32 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 2 लाख 27 हजार 439 इतके आहेत. देशात एकूण कोरोनामुळं मृतांची संख्या 18 हजार 213 झाली आहे. 20 जुलै पर्यंत देशात 92 लाख 97 हजार 749 चाचण्या झाल्या आहेत.























