एक्स्प्लोर
Advertisement
वादग्रस्त IPS अधिकारी भाग्यश्री नवटाके यांची औरंगाबादला बदली
क्लिप वायरल झाल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत होती. आज मुंबईमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांची बदली करण्यात आली आहे.
बीड : अनुसूचित जातींच्या लोकांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांची अखेर औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. कथित व्हायरल क्लिपमध्ये "अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील 21 व्यक्तींना फोडून काढले आहे," असे धक्कादायक वक्तव्य डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांनी केले आहे.
क्लिप वायरल झाल्यानंतर मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत होती. आज मुंबईमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. या वायरल व्हिडीओची चौकशी करण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांना नेमण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणाचा तपास हा बीडबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.
'21 दलितांना फोडून काढले,' महिला IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ
"अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील 21 व्यक्तींना फोडून काढले आहे," असे धक्कादायक वक्तव्य डीवायएसपी भाग्यश्री नवटाके यांनी केले होते. माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांच्या बेताल वक्तव्याची एक व्हिडीओ क्लीप वायरल झाली आहे. या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे IPS अधिकारी आणि माजलगावच्या डीवायएसपी असलेल्या भाग्यश्री नवटाके यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. नवटके यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी दिला आहे. भाग्यश्री नवटाके या व्हिडीओ क्लिपमध्ये काही लोकांशी बोलताना असे म्हणत होत्या की, तुम्ही मराठा आहेत म्हणून मी फक्त तुमच्या पाठीवर मारते, जर दलित असते तर मी त्यांना फोडून काढले असते. एका प्रकरणात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मदत कशी केली आणि अनुसूचित जातींच्या लोकांना कसा धडा शिकवला याबद्दलही या क्लिपमध्ये त्या सांगत आहेत. भाग्यश्री नवटाके यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी बाबूराव पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement