एक्स्प्लोर
Advertisement
भाजपच्या बँकेत मतांची गुंतवणूक करा, 5 पट विकास परतावा देऊ: मुख्यमंत्री
नागपूर: ‘गुंतवणूक चांगल्या बँकेत करता. मग मताची गुंतवणूकही योग्य बँकेत करा. आपण मत भाजपाच्या बँकेत केले तर 5 वर्षात 5 पट विकासाचे परतावे देऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.’ ते नागपूरमध्ये प्रचारसभेत बोलत होते.
‘आमच्या बँकेला सोन्याची दार नसतील. पण आमच्या बँकेत मोदी, गडकरी आणि मी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बँक दिवाळखोरीला निघाल्या आहेत.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.
‘राष्ट्रवादी-काँग्रेसवाल्यांच्या भाषणात सामाजिक न्याय आहे. मात्र कृतीत सामाजिक न्याय नाही. आमच्या भाषणात सामाजिक न्याय नसेल पण कृतीत मात्र नक्कीच आहे.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.
‘नागपुरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2019पर्यंत गरीबांना घर देऊ. मोदी यांनी देशासाठी 2022ची डेडलाइन ठेवली असली तरी आम्ही 2019 पर्यंत घरे देऊ. झोपडपट्टीवासियाना मालकी हक्काचे पट्टे देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आतापर्यंत 5 हजार जणांना मालकी हक्काचे पट्टे देण्यातही आले आहेत.’ असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, 21 फेब्रुवारीला नागपूरसह 10 महानगरपालिकांना मतदान पार पडणार आहे. तर 23 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
संबंधित बातम्या:
'आदित्य ठाकरे मुंबईसाठी अदखलपात्र' : आशिष शेलार
जगात भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंहांची ओळख होती : दानवे
‘टक्केवारीनं मुंबईचा घात केला’, पार्ल्यातील सभेत नितीन गडकरींचा आरोप
अमित शाहांची संपत्ती जाहीर, आता उद्धव ठाकरेंची करणार का? : माधव भांडारी
VIDEO : तो आहे देवेंद्र आमचा... भाजपचं कॅम्पेन साँग लाँच
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement