विशाळगडप्रकरणी इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द, उद्या राज्यभरात निदर्शने, असल्या चिल्लर लोकांना घाबरत नाही, जलील म्हणाले...
Chhatrapati Sambhajinagar: विशाळगड प्रकरणी कोल्हापूरात झालेल्या राड्याप्रकरणी MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील १९ जुलैला विशाळगडावर जाणार होते. पण त्यांनी आता कोल्हापूरचा दौराच रद्द केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar: विशाळगडावर (Vishalgad) झालेल्या राड्याप्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी १९ जुलै रोजीचा कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. पोलीसांनी विनंती केल्याने उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द केल्याचे जलील म्हणाले आहेत. मात्र, उद्या राज्यभरात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसह तहसील कार्यालयांसमोर निदर्शने करणार असल्याचे जलील यांनी सांगितले आहे.
यासोबतच काही लोकांनी मला कोल्हापूरला येण्यासाठी विरोध केला आहे, पण अशा चिल्लर लोकांना आपण घाबरत नाही असे म्हणत जलील यांनी कोल्हापूर दौरा रद्द केल्याचे सांगितले.
उद्या राज्यभर एमआयएमची निदर्शने
कोल्हापूर दौरा रद्द केला असला तरी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर दुपारी 3 वाजता उद्या एमआयएम तीव्र निदर्शने करणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) म्हणाले. कोल्हापूरमध्ये आणि गाजपूर गावात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीतील सर्व धर्मांच्या लोकांना निषेध नोंदवण्याचे आवाहन केलं होतं.
छत्रपती शाहू महाराजांच्या धरतीवर ही घटना दूर्देवी
कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांची धरती आहे. आणि तिथे अशा प्रकारचे घटना होणं हे अतिशय दूर्दैवी असल्याचे ते म्हणाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व पक्षाच्या युनिट्सला आम्ही 19 जुलै रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 3 वाजता निदर्शने करण्याचा आदेश दिला असल्याचे जलील यांनी सांगितले.
कोल्हापूरचा दौरा आता रद्द केला असला तरी मी कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीमुळे कोल्हापूरला जाता आलं नाही. ज्याप्रकारे विशाळगडी व परिसरात अतिक्रमण आंदोलनाला हिंसक वळण लागले, हे निंदनीय असल्याचे जलील यांनी सांगितले.
पोलिसांच्या विनंतीमुळे दौऱ्या रद्द
कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मागील दोन-तीन दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात न येण्याची विनंती केल्यामुळे हा दौरा पुढे ढकलला असल्याचे सांगत तिथल्या काही संघटनांनी विरोध केला असला तरी अशा चिल्लर लोकांना मी घाबरत नाही असे जलील म्हणाले.
१९ जुलैला केली होती कोल्हापूर दौऱ्याची घोषणा
विशाळगड हिंसाचारप्रकरणी एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून येत्या 19 जुलैला कोल्हापुरात धार्मिक स्थळी झालेल्या तोडफोडीच्या विरोधात एमआयएमचे राज्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून सांगितले होते.
इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!
"मी कोल्हापुरातील मौलाना, धार्मिक संघटनांना प्रश्न विचारतो. ते सेक्युलर पक्षांना मतदान करायचं म्हणून रस्त्यावर आले होते. मुस्लिमांनी दोन-दोन तास ऊनात उभं राहून ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं." असं इम्तियाज जलील यांनी संभाजीराजेंना सुनावलंय.
हेही वाचा: