संभाजीनगर हादरलं! नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरु होते लैंगिक शोषण
Chhatrapati Sambhaji Nagar : पीडितेच्या फिर्यादीवरून दोन आरोपीविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संतापजनक प्रकार समोर आला आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे 6 महिन्यांपासून लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन दोन आरोपीविरुद्ध सोमवारी (26 जून) रात्री उशिरा कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे अशी आरोपींचे नावं असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कन्नड शहरालगतच्या एका गावात नववीच्या वर्गात शिकणारी पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपी रामेश्वर कवडे याने तिच्या घरात प्रवेश करुन तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास तुझी बदनामी करेन, तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच आरोपीने वारंवार बलात्कार केला. ही बाब दुसरा आरोपी मोहन शिंदे याच्या निदर्शनास आली. त्यानेही पीडितेला आपल्यासोबतही शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझ्या आई-वडिलांना सांगतो, असे म्हणत बलात्कार केला.
याबाबत चार दिवसांपूर्वी पीडितेने आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कन्नड शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यात आरोपी रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे हे गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक शोषण करत असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन दोन्ही आरोपींविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पिंक पथकाचे पोउपनि राम बारहाते करत आहेत.
दोघांनी केला अत्याचार...
रामेश्वर कवडे याने अल्पवयीन पीडित मुलीच्या घरात कोणीही नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान तिला बदनामी करण्याची धमकी दिल्याने तिने याबाबत कोठेही वाचता केली नाही. मात्र याची माहिती दुसरा आरोपी मोहन शिंदे याला मिळाली. त्यामुळे त्यानेही पीडितेला आपल्यासोबतही शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझ्या आई-वडिलांना सांगतो, असे म्हणत बलात्कार केला. या घटनेने मुलीला मानसिक धक्का बसला. शेवटी तिने आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: