एक्स्प्लोर
गुप्तधनासाठी चिमुकल्या युगचा बळी, दोन तांत्रिकांना बेड्या
केसात तीन भोवरे असलेल्या युग मेश्राम 22 ऑगस्ट रोजी घराशेजारी खेळताना अचानक बेपत्ता झाला होता.
चंद्रपूर : चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाळा इथून बेपत्ता झालेल्या दोन वर्षीय युग मेश्रामची गुप्तधनाच्या लालसेतून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. घराशेजारील तांत्रिकाने युगचा बळी दिला. या प्रकरणी सुनील आणि प्रमोद बनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
केसात तीन भोवरे असलेल्या युग मेश्राम 22 ऑगस्ट रोजी घराशेजारी खेळताना अचानक बेपत्ता झाला होता. युग मेश्रामच्या घराजवळच असलेल्या एका तनशीच्या ढिगाऱ्यात काल (29 ऑगस्ट) त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांची तीन पथकं त्याचा शोध घेत होती. मात्र काल पोलिसांना घराशेजारीच त्याचा मृतदेह आढळला.
या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखेर युग मेश्रामाचा नरबळीच असल्याचं सुनील आणि प्रमोद बनकरच्या चौकशीतून समोर आलं. घरासमोर खेळणाऱ्या युगला चॉकलेटचं आमिष दाखवून हे आरोपी त्याला घेऊन गेले. त्यानंतर युगची पूजा करुन त्याची हत्या केली. गुप्तधनाच्या लालसेपोटी युगचा बळी दिला.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात याआधीही जोदूटोणा, भानामती, मजली अशा प्रकारात अनेकांचे बळी गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement