Crop Damage: राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाला मुहूर्त सापडला; पथकामध्ये कोणाचा समावेश, कुठे करणार पाहणी?
Crop Damage: राज्यातील काही भागांमध्ये अद्यापही अतिवृष्टी सुरू आहे त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती त्यावेळी शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं.

मुंबई: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान (crop damage) झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारच्या पथकाला मुहूर्त सापडला आहे. नऊ सदस्यांचे हे पथक आजपासून नुकसानग्रस्त (crop damage)भागाची पाहणी करणार आहे. राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकं वाया गेली आहेत. नागरी भागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान (crop damage) झालं आहे. राज्य सरकारने आपत्तीग्रस्तांना (crop damage)दिलासा देण्यासाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर केलं आहे, तर केंद्र सरकारनं 1566.40 कोटींचा निधी वितरित केलेला आहे. हे पथक ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. (crop damage)
Crop Damage: पथकात कोणाचा समावेश?
राज्यातील काही भागांमध्ये अद्यापही अतिवृष्टी सुरू आहे त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती त्यावेळी शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं. त्याचीच पाहणी करण्यासाठी आता केंद्राचे पथक महाराष्ट्र मध्ये दाखल झालेला आहे. काल (सोमवारी) हे पथक मुंबईमध्ये आलेला आहे. आज ते प्रत्यक्ष फिल्डवर जाणार आहेत. शेतकऱ्यांचा किती प्रमाणात नुकसान झाला आहे याची ते पाहणी करणार आहे, केंद्रीय आंतरिक सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव आर. के. पांडे यांच्या नेतृत्वाखाली नऊ सदस्यांचे पथकाने मुंबईत बैठका घेतल्या. या पथकात कृषी विभागाचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्प पटेल, जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग, रस्ते आणि महामार्ग वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवर सचिव अभिषेक राज, ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सारेन, इस्रोचे संचालक डॉ. एसव्हीएसपी शर्मा, गृह मंत्रालयातील उपायुक्त आशीष गौर यांचा समावेश आहे.
Crop Damage: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
हे पथक दिवसभर फील्ड व्हिजीट करणार आहे काल त्यांनी मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकार्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. यामध्ये केंद्र सरकारने 1566.40 कोटींचा निधी वितरित केला होता. प्रत्यक्ष किती नुकसान झालेलं आहे, काय नुकसान झालेलं आहे याचा संपूर्णपणे पाठपुरावा या पाहणीवेळी केला जाईल. त्यानंतर ते केंद्राला पाठवले जाईल. त्यानंतर केंद्र सरकार देखील पॅकेज जाहीर करेल. अशातच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याने हे राजकीय दृष्टीने देखील फायदेशीर ठरणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारचे हे पथक पाहणी करेल आणि माहिती केंद्राला पाठवेल त्यानंतर शेतकऱ्यांसाठी किती कोटींचा पॅकेज जाहीर होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Crop Damage: दोन दिवसात राज्यभरात दौरे
केंद्रीय पथकासह राज्याच्या विविध विभागातील वरीष्ठ अधिकारी पुढील दोन दिवस नुकसानग्रस्त भागाची पहाणी करणार असल्याची माहिती आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना सर्व राजशिष्टाचार विषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्याने धाराशिव, सोलापूर, नाशिक, वाशिम या सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांत पथकाचा दौरा होण्याची शक्यता आहे.
























