Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल; आमदार राजू पाटील आक्रमक, म्हणाले...
Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आमदार राजू पाटीला आक्रमक झाले आहेत.
Raj Thackeray News : मंगळवारी ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर सभा घेतली होती. या सभेत तलवार दाखवल्या प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेते आक्रमक झाले आहेत. मनसे आमदार राजू पाटील ट्वीट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आमदार पाटील यांनी सरकारवर टीका करणारे ट्वीट केले आहे. राजू पाटील यांनी म्हटले की, शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे ? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय ? एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब …!अशा शब्दात राजू पाटील यांनी सरकारवर टीका केली.
शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे ? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय ? आणि एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब ….! #UT @OfficeofUT
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 13, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठाण्यामध्ये मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेची मंगळवारी झालेली उत्तर सभा चांगलीच चर्चेत आहे. राज यांनी या सभेत तलवार दाखवली होती. या प्रकरणी ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौपाडा पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'आज रोजी नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत 12 एप्रिलला गडकरी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेदरम्यान अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार दाखवली. या प्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि कलम 34 सह भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 आणि 25 अन्वये अध्यक्ष मनसे राज ठाकरे, ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव आणि मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलवार म्यानातून काढल्याबद्दल याआधी देखील पोलिसांनी सामान्यांसह राजकीय नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर आज नौपाडा पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: