मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंच्या विरोधातील ठाकरे गटाचा उमेदवार ठरला?, थेट ट्वीटवरून घोषणा
Kalyan Lok Sabha Constituency : कल्याणचे विद्यामान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधातील ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित झाला आहे.
Kalyan Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या (Kalyan Lok Sabha) संदर्भात मोत्य्ही बातमी समोर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र आणि कल्याणचे विद्यामान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधातील ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Poul) यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, याबाबत स्वतः अयोध्या पोळ यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
याबाबत आपल्या ट्वीटमध्ये अयोध्या पोळ यांनी म्हटले आहे की, “आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे, असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आदरणीय साहेब, आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, वरुणजी सरदेसाई, साईनाथजी दुर्गे....
आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने #मशाल चिन्हावर शिवसेनेकडून #कल्याण लोकसभा लढवत आहे..🚩💪
— Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) April 1, 2024
ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या #खासदार मुलाच्या विरोधात संधी…
'एप्रिल फुल' तर नाही ना?
ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून कल्याणमधून आपल्याला उमेदवारी मिळाली असल्याची स्वतःच घोषणा केली आहे. मात्र, ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अयोध्या पोळ यांचा ट्वीट 'एप्रिल फुल' तर नाही ना? अशीही चर्चा आहे.
कोणत्या सेनेची ताकद जास्त?
कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समाजाला जातो. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं राजकीय वर्चस्व पाहायला मिळते. या मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यात भाजपकडे तीन मतदारसंघ असून, शिवसेनेकडे एक मतदारसंघ आहे. तसेच एक मनसे आणि एक राष्ट्रवादीचा आमदार या मतदारसंघात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत असल्याने या मतदारसंघात शिंदेंच्या सेनेची ताकद जास्त आहे की, ठाकरेंच्या सेनेची हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
2019 मधील कल्याण लोकसभा निकाल...
मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या श्रोकांत शिंदे यांना 4 लाख 51 हजार 346 मते मिळाले होते. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना 1 लाख 24 हजार 925 मते मिळाली होती. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी तब्बल 3 लाख 26 हजार 421 आघाडी घेत विजयाचा भगवा फडकवला होता. आता पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
Kalyan Lok Sabha : डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोणाचे आव्हान? कल्याण लोकसभेत कोण बाजी मारणार?