![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Breaking News LIVE | जालना : जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती राजेश सोनी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न
Breaking News LIVE Updates, 23 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
![Breaking News LIVE | जालना : जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती राजेश सोनी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न Breaking News LIVE | जालना : जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती राजेश सोनी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/23123653/WhatsApp-Image-2021-02-08-at-6.45.26-AM.jpeg)
Background
संजय राठोड पोहरागडला जाणार, शासकीय दौरा जाहीर
यवतमाळ/वाशिम : गेले अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा शासकीय दौरा जाहीर झाला आहे. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड अनअव्हेलेबल होते. परंतु उद्याचा त्यांचा शासकीय दौरा जाहीर झाला असून अनेक दिवसांनी ते कॅमेऱ्यासमोर दिसतील. संजय राठोड वाशिममधल्या पोहरादेवीचं दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. यावेळीच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आपली बाजू स्पष्ट करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Coronil औषधा संदर्भातील बाबा रामदेव यांचा दावा खोटा, IMA ने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण
पतंजलीच्या कोरोनिल (Coronil) टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याची बातमी खोटी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सोमवारी सांगितले. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. कोरोनील औषध कोविड 19 वर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला आहे. कोणत्याही आयुर्वेदीक औषधाला कोविडवर उपचार करण्यासाठी प्रमाणपत्र दिले नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने 19 फेब्रुवारीला डब्ल्यूएचओ सर्टिफिकेशन योजनेत कोरोनील औषधाला कोविडवरील उपचारासाठी आयुष मंत्रालयाने प्रमाणपत्र दिल्याचे सांगितले होते.
मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या शिक्षकांच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर; आंदोलनाचा इशारा
आझाद मैदानात मागील 21 दिवसांपासून मुंबई महापालिकेत नोकरी मिळावी या मागणीसाठी काही शिक्षक आंदोलन करत आहेत. या शिक्षकांना आता मराठी एकीकरण समितीने देखील पाठींबा दिला आहे. याबाबत बोलताना मराठी एकीकरण समितीचे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष सचिन दाभोळकर म्हणाले की, "या शिक्षकांचे म्हणणे आहे की त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत मराठीत झाल्यामुळे त्यांना पालिकेने नोकरी नाकारली आहे." सचिन दाभोळकर पुढे बोलताना म्हणाले की, "जवळपास दीडशे विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेकडून हा अन्याय करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली. त्यावेळी जाहिरातीमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषेत शिक्षण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)