...तर कोल्हापुरातील मतदारांचीही ईडीकडून चौकशी होणार : चंद्रकांत पाटील
"कोल्हापूरमध्ये काही लोकांनी मतदारांना पेटीएमच्या माध्यमातून पैसे देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही ईडीकडे या प्रकाराची तक्रार करणार आहोत. त्यामुळे तुमचीही चौकशी होऊ शकते, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे.
Chandrakant Patil : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी कोल्हापुरातील मतदारांची ईडीकडून (ED) चौकशी होऊ शकते, असे म्हटले आहे. "काही लोकांनी मतदारांना पेटीएमच्या माध्यमातून पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मतदारांनो हे पैसे घेऊ नका. आम्ही ईडीकडे या प्रकाराची तक्रार करणार आहोत. त्यामुळे तुमचीही चौकशी होऊ शकते, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी मतदारांना इशारा दिला आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्फर करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप चंद्रकात पाटील यांनी केला आहे. याबाबत आपण ईडीला पत्र लिहून तक्रार करणार असल्याचे सांगत, एक हजार रूपयांसाठी इडीचा ससेमीरा मागे लावून घेऊ नका, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, "तुमच्या खात्यावर पेटीएमच्या माध्यमातून एक हजार रूपये येऊ शकतात. परंतु, असे पैसे तुमच्या खात्यावर आले तर, त्याची ईडीकडून चौकशी होऊ शकते. हे पैसे कोठून आले? आणि पाठवणाराने ते कोठून आणले? याची चौकशी ईडीकडून होऊ शकते. कोल्हापूर उत्तर मतदार संघात मोठ्या प्रमाणात काळा पैसा पेटीएमच्या माध्यमातून ट्रान्फर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी लोकांना विनंती करतो की, एक हजार रूपयांसाठी ईडीचा ससेमीरा मागे लावून घेऊ नका."
"कोल्हापुरातील एका शिक्षण संस्थेचे विद्यार्थी एका फॉर्मद्वारे मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदारांच्या बँक खात्यात पेटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याची शक्यता आहे. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा ट्रान्फर होण्याची शक्यता असून याबाबत आपण ईडीकडे तक्रार करणार असल्याचे, चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती; ऋतुराज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला
- माझ्या नवऱ्याची एक भानगड काढून दाखवा, मी तुमच्या शंभर भानगडी काढेन; चित्रा वाघ यांचे सतेज पाटलांना आव्हान
- Kolhapur by Election : 'समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगड मारता, चित्रा वाघ थेरांना घाबरणारी नाही'
- कोल्हापुरात भाजपच्या माजी खासदाराचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल