कोल्हापुरात भाजपच्या माजी खासदाराचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल
Dhananjay Mahadik Controversial Statement : माजी खासदार धनंजय महाडिक यांच महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य. छत्रपती ताराराणी महाराणींच्या नगरित महिलांचे योगदान विसरलात का?, सर्वपक्षीय महिलांचा सवाल.
Dhananjay Mahadik Controversial Statement : माजी खासदार धनंजय महाडिक यांच महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. महिलांच्या कर्तृत्वावर उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे धनंजय महाडिक अडचणीत आले आहेत. दरम्यान, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारादरम्यान वक्तव्य केलं आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
धनंजय महाडिकांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या उमेदवार महिला आहेत, त्यामुळे महिलेला मतं द्या, असं ते सांगतील. पण जे काम तुमचा प्लंबर असलेला, इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो, ते तुम्हाला जमणार आहे का? ज्याचे काम त्यानंच करावं, अशी टिप्पणी महाडिक यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
भाजप उमेदवार सत्यजित कदम यांनी बुधवारी सकाळी कोल्हापुरातील कसबा बावड्यातून प्रचारफेरी काढली. कसबा बावडा हे पालकमंत्री सतेज पाटील यांचं गाव. त्यामुळे तिथे सतेज कदमांच्या प्रचार फेरीला कितपत प्रतिसाद मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. या प्रचार फेरीला भाजप आमदार सुरेश हाळवणकरही उपस्थित होते. त्यांनी भाजपच्या स्वागतासाठी कसबा बावड्यातील महिलांनी काढलेली रांगोळी पालकमंत्र्यांच्या चमच्यांनी पाण्याचा टँकर आणून धुवून काढल्याची टीका केली. त्यांच्या या टीकेला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं होतं. सतेज पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी ही रांगोळी कसबा बावड्यातील महिलांनी काढलीच नव्हती, तर भाजपच्या उमेदवाराची प्रचार फेरी असल्याने भाजपनेच ती एका महिलेला कंत्राट देऊन काढायला लावली होती, असा दावा केला. सकाळी साडेसहा वाजता ते जेव्हा रांगोळी काढत होते, तेव्हा त्यांना त्याबद्दल हटकलं, तेव्हा त्यांनी भाजपकडून आम्हाला प्रत्येक गल्लीच्या सुरुवातीला अशी रांगोळी काढण्यास सांगितल्याचंही त्यांनी सांगितलं. रांगोळी काढत असतानाचा व्हिडीओही त्यांनी व्हायरल केला. रात्री-अपरात्री रांगोळी काढून स्वागत करण्याची बावडेकरांची परंपरा नाही. बावड्यातील महिला स्वाभिमानी आहेत, त्यांना स्वागत करायचंच असतं, तर हातात आरतीचं ताट घेऊन त्यांनी स्वागत केलं असतं. एकही महिला रस्त्यावर, दारात नव्हती यावरूनच भाजपच्या उमेदवारानं बावडेकरांच्या मनांत काय आहे? हे समजून घ्यावं, अशी टिपण्णी त्यांनी केली होती.
दरम्यान, छत्रपती ताराराणी महाराणींच्या नगरित महिलांचे योगदान विसरलात का? असा सवाल महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार धनंजय महाडिक यांना सर्वपक्षीय महिलांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :