Majha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सहा आरोपींना आज बीड न्यायालयात हजर केलं जाणार, सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणेला हजर करण्यात येणार.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज न्यायालयात जबाब नोंदवणार, तसेच सर्व आरोपींना ज्यांनी आश्रय दिला त्या सर्वांनाही अटक करण्याची मागणी
नांदेडच्या पालकमंत्रिपदी धनंजय मुंडे नको, सकल मराठा समाजाची मागणी, मुंडेंकडे नांदेडचं पालकमंत्रिपद दिल्यास रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा.
परभणीतून आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा आज दुसरा दिवस, मुंबईतील मंत्रालयावर हा लाँग मार्च धडकणार, अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी जनतेचा सहभाग.
शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं २ दिवसीय शिबिर, पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार.
राज्य सरकारने सीमा प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांचं वक्तव्य, तर सीमाप्रश्नासाठी सर्व खासदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार, शाहू छत्रपतींचं आश्वासन.
दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या ५ हजार लालपरी बसेस खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार, सरनाईकांची माहिती.