Kolhapur by Election : 'समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगड मारता, चित्रा वाघ थेरांना घाबरणारी नाही'
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत.
Kolhapur by Election : कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, काल भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh ) प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या होत्या. कोल्हापूर येथील प्रचारात बोलताना त्यांच्या सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगड मारता, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपनं कोल्हापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये होत्या. कोल्हापूर येथील प्रचारात बोलताना सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां. सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन केला आहे. तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा. असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
वाह रे बहाद्दरांनो…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 3, 2022
समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां…
आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर उमेदवार @SatyajitKspeaks प्रचारार्थ सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली…
तुमची दहशत गुंड बलात्कार्यांवर दाखवा…असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा
कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील तर काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. दोघांनीही कोल्हापुरात तळ ठोकला आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मविआवर टीका सतत टीका करत आहे. राष्ट्रवादी सरकार चालवत असून काँग्रेस आणि सेनेच्या नेत्यांचे फक्त गाड्या फिरवण्याचे काम सुरु असल्याचे चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. काँग्रसनं 50 वर्षात काय केलं ते सांगा असे चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. तर सतेज पाटीलही त्यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: