एक्स्प्लोर

Bhandara hospital fire case : भंडारा आगप्रकरणी सिव्हिल सर्जनसह तिघे निलंबित, तिघे सेवामुक्त : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Bhandara hospital fire case : भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग प्रकरणात एका डॉक्टरसह तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केलं आहे.

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणाऱ्या भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर आला आहे. 9 जानेवारी रोजी रुग्णालयात नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका डॉक्टरसह तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भंडारा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल काल रात्री उशीरा आला. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असं टोपेंनी सांगितलं.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, कुणावर काय कारवाई डॉ प्रमोद खंडाते, सिव्हिल सर्जन - निलंबित डॉ. सुनीता बडे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन- बदली अर्चना मेश्राम, वैद्यकीय अधिकारी- निलंबित सुशील अंबडे, बालरोग तज्ञ - सेवा समाप्त ज्योती भारस्कार, नर्स इनचार्ज - निलंबित स्मिता आंबीलडुके, स्टाफ नर्स - सेवा समाप्त शुभांगी साठवणे, स्टाफ नर्स - सेवा समाप्त

Bhandara Hospital Fire | भानारकर दाम्पत्याच्या मदतीला बारामतीमधील डॉक्टर सरसावले, टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून संततीप्राप्तीचा खर्च उचलणार

अहवालात नेमकं काय सांगितलं अहवालात सांगण्यात आलं आहे की, रात्री एक ते दीड दरम्यान बेबी वार्मर कंट्रोल पॅनलमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागली. या ठिकाणी प्लास्टिक मटेरियल होतं. तसेच कॉटन गाद्या,वायर्स होत्या. बेबी वार्मरला आग लागली, त्यावेळी काही बाळं ऑक्सिजन वर होती. आग वाढली आणि ती रूम बंद असल्याने आणि प्लास्टिक मटेरियल असल्याने आग विझल्यावर धूर पसरला. फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार या घटनेतील तीन बाळांचा आगीमुळे मृत्यू झाला तर 7 बालकं धुरामुळे गुदमरून मरण पावली.

भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू

टोपेंनी सांगितलं की, या घटनेत जी बिल्डिंग बंधण्यात आली ती 2015 साली पूर्ण झाली. ह्यात national health mission मधून 2 कोटी निधी दिला होता.सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलं. 2016 साली याचं उद्घाटन झालं. त्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने आगीचे ऑडिट तपासण्याची आवश्यकता होती ते झालं नाही. घाईगडबडीने उद्घाटन झालं, असं त्यांनी सांगितलं.

प्रमुख तीन कारणं - 2016 मध्ये हॉस्पिटल इमारत हस्तांतरित करताना आवश्यक NOC दिली नव्हती. - तांत्रिक मान्यता फायर ऑडिट प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोव्हेंबरपासून पडून आहे - तेथील डॉक्टर, नर्स स्टाफ कर्तव्यात कसूर

काय आहे प्रकरण? भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) 9 जानेवारी रोजी आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात आलं. या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील होती. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवलं जातं.

Bhandara Hospital Fire | भंडारा रुग्णालय आगीचा अहवाल समोर; शॉर्ट सर्किटमुळे आग, दोन नर्सवर बेजबाबदारपणाचा ठपका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget