Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, शेकडो जखमी, निरंजनी अखाड्याचे संत रडले
Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, शेकडो जखमी, निरंजनी अखाड्याचे संत रडले
Maha Kumbh Stampede प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामळं आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतर मौनी अमावस्येनिमित्त होणाऱ्या अमृत स्नानाचा निर्णय रद्द केला आहे. आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नाही. आखाड्यांनी त्यांच्या मिरवणुकांना शिबिरांना माघारी बोलावण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती महंत रवींद्र पुरी यांनी दिली.
घटना कधी घडली?
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरी झाली. रात्री 1 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूनं लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या























