Maharashtra Temple Dress Code :देवाच्या दारी,नियमांची वारी; 3देवस्थानांचे मोठे निर्णय Special Report
राज्यातल्या दोन प्रमुख देवस्थान समित्यांनी भाविकांसाठी काही नवे नियम लागू केले आहेत. सिद्धिविनायक मंदिर न्यासानं नवा ड्रेस कोड लागू केलाय. तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीनं नवदाम्पत्यासाठी सूट दिलीये. मात्र तुळजापूरमध्ये एका नियमावरुन सुरु असलेला वाद सुरुच आहे. पाहूयात देवाच्या दरबारातील ही नियमांची 'वारी' या स्पेशल रिपोर्टमधून
मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर...
पंढरपूरचं विठ्ठल मंदिर...
आणि धाराशीवमधलं तुळजाभवानी मंदिर...
राज्यातली ही तीन मोठी देवस्थानं
त्यांनी लागू केलेल्या नव्या नियमांमुळे सध्या चर्चेत आहेत...
मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात
आता ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय...
सिद्धिविनायक न्यासानं यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलंय...
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून हा ड्रेस कोड लागू होणार आहे...
नव्या नियमानुसार सिद्धिविनायक मंदिरात येताना...
नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करावे
भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा
पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे परिधान करावे
तोकडे कपडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही..
सिद्धिविनायक मंदिरानंतर आता जाऊयात पंढरी नगरीत....
पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत राहावं लागतं
पण या रांगेतून नवदाम्पत्यांना सूट देण्यात आली आहे...
मंदिर समितीच्या बैठकीत एक नवा निर्णय घेण्यात आलाय...
नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आता थेट दर्शन मिळणार आहे....
वेगवेगळे देव
वेगवेगळी देवस्थानं
आणि वेगवेगळे नियम
कुणाकडून स्वागत होतंय तर कुणाकडून नाराजीचा सूर आळवला जातोय
तुळजापूरहून अप्पासाहेब शेळके आणि शिर्डीहून नितीन ओझासह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई