एक्स्प्लोर

#AyodhyaVerdict | अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर 'या' गोष्टी टाळा, अन्यथा होऊ शकते कायदेशीर कारवाई

अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियातून आक्रमक आणि भडकाऊ टीका-टिप्पणी करणे टाळावे, असं आवाहनही पोलिसांकडून केलं जात आहे.

मुंबई : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा, शांतता राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र निकालानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियातून आक्रमक आणि भडकाऊ टीका-टिप्पणी करणे टाळावे, असं आवाहनही पोलिसांकडून केलं जात आहे.

अयोध्या निकालानंतर या गोष्टी टाळा

  • जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.
  • सोशल मीडियावर अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज फॉरवर्ड करु नका.
  • निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये, गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.
  • मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.
  • महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.
  • निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये. कोणतंही वाद्य वाजवू नये.
  • कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर करुन अफवा पसरवू नये.

वरील सूचनांचे उल्लंघन करुन जातीय तणाव निर्माण केल्यास, भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता कलम आणि इतर कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे.

रामजन्मभूमी विवादाचा निकाल उद्या अपेक्षित असूनया निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावीअसं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीतअशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहेअसंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यावर्षी 5 ऑगस्टपासून निकालाची नियमित सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास 40 दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र उद्या सुट्टीच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याचं ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीचं घटनापीठ हा निकाल सुनावणार आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari :  विठुरायासाठी खास रेशमी पोशाखShankaracharya Special Report : शंकराचार्यांच्या प्रतिक्रियेवर कुणाचं काय मत?Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामाTop 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : 16 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Kamathipura : कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
Embed widget