एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुप्रियाताई स्वपक्षालाच सुळावर का चढवता?: आशिष शेलार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी टीका केली आहे.
'ताई पवार म्हटलं की, सल्ले द्यायलाच हवे का?, कशाला स्वपक्षालाच सुळावर चढवता?' असं म्हणत त्यांनी शेलार यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
'मुख्यमंत्री चांगलंच काम करीत आहेत. ते जनतेला दिसत देखील आहे. विरोधात बसल्यावर संतुलन बिघडलं आहे. ताई तिथं बसणं देखील किती जड जात आहे हे देखील जनता पाहत आहे.' असा हल्लाबोल शेलारांनी केला आहे.
कोपर्डी प्रकरणी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला देखील शेलार यांनी उत्तर दिलं आहे. 'कोपर्डी प्रकरणी चार्जशीट दाखल होणारच. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची किंवा बोंबाबोंब करुन श्रेय लाटण्याची ताई घाई कशाला करता?' असं म्हणत शेलारांनी टोला हाणला आहे.
मुख्यमंत्री चांगलेच काम करीत आहेत,जनतेलादिसते आहे.विरोधात बसल्यावर संतुलन बिघडलेय,तीथे बसणे किती जडजातेय हेही ताई जनता पाहतेय.@supriya_sule
— ashish shelar (@ShelarAshish) October 5, 2016
ताई पवार म्हटले की सल्ले द्यायला हवेच का? कशाला सुळावर चढवताय स्वपक्षालाच! @supriya_sule — ashish shelar (@ShelarAshish) October 5, 2016
दरम्यान, कोपर्डी बलात्कार प्रकरणात जर येत्या दोन दिवसात चार्जशीट दाखल झालं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला होता. कोपर्डीप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र आज कोपर्डी घटनेला 84 दिवस झाले आहेत. तरीही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नाही. नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते. 'कपिलची दखल, शेतकऱ्यांची नाही' मुख्यमंत्री कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या तक्रारीची दखल घेतात, पण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. 'मुख्यमंत्रीको गुस्सा क्यूं आता है' मुख्यमंत्री को गुस्सा क्यूं आता है, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना काम झेपत नसेल तर राजीनामा द्या, पुन्हा विरोधी पक्षनेते व्हा आणि खुशाल भाषण ठोका, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'शिवसेनेला टोला' यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेलाही टोला लगावला. तुम्हालापण लेकी सुना आहेत, स्वाभिमानी महिलांचा स्वाभिमान दुखावू नका, असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला. संंबंधित बातम्या कोपर्डीप्रकरणी दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा....कोपर्डी प्रकरणी चार्जशीट दाखाल होणारच आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची किंवा बोंबाबोंब करून श्रेय लाटण्याची ताई घाई कशाला करताय?
— ashish shelar (@ShelarAshish) October 5, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement