Russia Ukraine Conflict : सोलापूर जिल्ह्यातील आणखी 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये; पाच जण मायदेशी परतले
Russia Ukraine Conflict : सोलापूर जिल्ह्यातील आणखी 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तर आतापर्यंत पाच विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतले आहेत.
Russia Ukraine Conflict : सोलापूर जिल्ह्यातील आणखी 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तर आतापर्यंत पाच विद्यार्थी सुखरूप घरी परतले आहेत. युक्रेनमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 37 विद्यार्थी असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. त्यातील पाच विद्यार्थी सुखरूप मायदेशात परतले असून आणखी 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने दिली आहे.
गेल्या गुरूवारपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांनी मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास दोन हजार भारतीय मायदेशात परतले आहेत. परंतु, आणखीही बरेच भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील 32 विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने सांगितले आहे.
सुप्रिया सुभाष खटकाळे (बठाण, ता. मंगळवेढा), अंकिता अनिल शहापुरे, सलोनी गेंगाणे (दोघीही जुळे सोलापूर) आणि ऋतुजा बाबासाहेब कबाडे (एखतपूर, ता. सांगोला) या विद्यार्थिनी रविवारी भारतात दाखल झाल्या आहेत. त्या आपल्या घरी सुखरूप परतल्या आहेत. आज लझिमा असिफ सय्यद (मनगोळी, ता. दक्षिण सोलापूर) ही विद्यार्थिनी आपल्या घरी पोहोचली आहे.
दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी 26 विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संवाद साधला आहे. तर इतर सहा विद्यार्थ्यांसोबत तांत्रिक कारणामुळे संपर्क होऊ शकला नाही. परंतु, उर्वरित विद्यार्थ्यांसोबतही लवकरात लवकर संपर्क साधला जाईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine Conflict : खारकिव्ह शहर तातडीनं सोडा, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे भारतीय नागरिकांना आदेश
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
- Crude Price Rise: कच्च्या तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिका देणार तीन कोटी बॅरल कच्चे तेल, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा