Russia Ukraine Conflict : खारकिव्ह शहर तातडीनं सोडा, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे भारतीय नागरिकांना आदेश
Russia Ukraine War : रशियानं खारकिव्ह शहरावरचे हल्ले वाढवले आहेत. खारकिव्हमधली शाळांची इमारतही रशियानं टार्गेट केली आहे.
Russia Ukraine War : खारकिव्ह शहरात भीषण हल्ले वाढवले आहेत. त्यामुळं भारतीयांनी तातडीनं खारकिव्ह शहर सोडावं असे आदेश परराष्ट्र मंत्रालयानं दिले आहेत. मात्र खारकिव्हमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. ट्रेनमध्येही भारतीयांना प्रवेश मिळत नाही, अशी माहिती तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. गोळीबाराचे आणि बॉम्बस्फोटाचे भीषण आवाज विद्यार्थ्यांच्या कानी पडत आहेत, असे देखील ते म्हणाले.
आज सकाळी सहा वाजता मुलांनी विद्यापीठ सोडलंय. बारा किलोमीटर पायी चालत ही मुलं कशीबशी रेल्वे स्टेशन वर पोहोचली आहेत. सुमारे दोन हजार मुलं सकाळपासून रेल्वे स्टेशन वरतीच उभा आहेत. त्यांना युक्रेनियन नागरिक ट्रेनमध्ये चढू देत नाहीत. युक्रेनच्या खारकिव्ह शहरात असलेल्या भारतीयांनी एबीपी माझाला ही भीषण परिस्थिती सांगितली आहे. सध्या ते रेल्वे स्टेशनच्या खाली आश्रय घेऊन बसलेले आहेत. त्या ठिकाणी प्रचंड स्फोटांचे आवाज येत आहेत आणि गोळीबारही सुरू आहे.
युक्रेनमधले एकूण भारतीय 23 हजार भारतीय अडकले होते. त्यापैकी 17 हजार भारतीयांना युक्रेनबाहेर काढले आहे. तीन हजार 350 जण भारतात आले आहे. तर जवळपास सहा हजारांच्या आसपास भारतीय अजून युक्रेनमध्ये अडकले आहेत. वायुसेनेची तीन विमानं ऑपरेशन गंगामध्ये सहभागी झाली आहेत.
आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चंदन जिंदाल असं या 22 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा पंजाबमधील बर्नाला या ठिकाणचा आहे. इस्केमिक स्ट्रोकच्या (Ischemic stroke) आजारामुळे चंदन जिंदालवर विनिस्टीयामधील इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. युक्रेनमधील खारकिव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कर्नाटकमधील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचे मंगळवारी निधन झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचे निधन झाल्याने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
संबंधित बातम्या:
- Russia Ukraine War : मिसाईल हल्ल्यानंतर युक्रेनमधील खारकिव्ह बेचिराख, मन हेलवणारी दृश्य
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
- Crude Price Rise: कच्च्या तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिका देणार तीन कोटी बॅरल कच्चे तेल, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा