एक्स्प्लोर
सीबीएसई 10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे.
मुंबई : सीबीएसईचे 10वी आणि 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेआधी अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सीबीएसई बोर्डाने सात आठवडे आधीच हे वेळापत्रक जाहीर केले आहे.
सीबीएसई बोर्डाने हे स्पष्ट केलं आहे की, मागच्या वर्षीप्रमाणे या वेळापत्रकामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. शिवाय हे वेळापत्रक असे तयार करण्यात आले आहे की, जेणेकरून कोणत्याही इतर परीक्षेत ही बोर्डाची परीक्षा येणार नाही. मागच्या वर्षी फिजिक्स आणि जेईई मेन परीक्षा एकाच दिवशी आली होती. त्यामुळे फिजिक्सची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
परीक्षा सकाळी साडे 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. उत्तरपत्रिका सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना देण्यात येतील, तर प्रश्नपत्रिका सव्वा दहा वाजता देण्यात येतील. यावर्षी 10 वी सीबीएसई परीक्षा जवळपास 18 लाख विद्यार्थी देणार आहेत तर 12 वी सीबीएसई परीक्षा जवळपास 13 लाख विद्यार्थी देणार आहेत.
10वी परीक्षांचे वेळापत्रक
12वी परीक्षांचे वेळापत्रक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement