एक्स्प्लोर
Advertisement
गुजरातचा निकाल डोळ्यात अंजन घालणारा : अनिल गोटे
भाजपमधील नाराजांची यादी वाढतच चालली आहे. धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटेंनी देखील आता भाजपला घरचा आहेर दिला आहे.
नागपूर : भाजपमधील नाराजांची यादी वाढतच चालली आहे. धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटेंनी देखील आता भाजपला घरचा आहेर दिला आहे.
गुजरात निवडणुकीनंतर अनिल गोटे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. गुजरात निवडणुकीचे निकाल डोळ्यात अंजन घालणारे असल्याचं गोटेंनी म्हटलं आहे.
याआधीही भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. खासदार नाना पटोलेंनी तर पक्ष सोडून आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ आता आमदार अनिल गोटे यांनीही घरचा आहेर दिला आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल गोटे?
‘सामान्य माणसाला 'गृहित' धरता येत नाही, हेच गुजरात निकालाने दाखवून दिलं आहे. नव्यानं पक्षात येणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या आणि पक्ष कार्यकर्त्यांना 'घरच्या गाईचे गोऱ्हे' अशी वागणूक द्यायची. अशा वर्तणुकीचा हा फटका आहे. आपल्याला मिळालेली सत्ता कायम आहे अशा गैरसमजात लाटेवर स्वार झालेल्यांच्या डोळ्यात या निकालानं अंजन घातलं आहे. वर्षभरात आपल्या पालिकेच्या निवडणुका आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी काय केलं, असं विचारण्यापेक्षा राज्यात आपली सत्ता असताना आपण काय केलं, हे जनतेसमोर ठसठशीत मांडता आलं पाहिजे.’भाजपमधील यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी, वरुण गांधी, लालकृष्ण अडवाणी, नाना पटोले, आशिष देशमुख, संजय काकडे, एकनाथ खडसे आणि आता अनिल गोटे हे बडे नेते पक्षाच्या आणि सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. संबंधित बातम्या : तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना खडसे अडखळले...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement