एक्स्प्लोर
Advertisement
अमित शाह धडधडीत खोटं बोलतायत, एनआरसीवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
देशाच्या आणि संविधानाच्या इतिहासात नागरिकता देण्याासाठी धर्माचा आधार घेतला आहे. धर्माचा आधार घेतला नाही पाहिजे. विशिष्ट समाजाला म्हणजे मुस्लीम समाजाला जाणूनबाजून वगळला आहे.
मुंबई : पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या बोलण्यात विसंगती आहे म्हणून या दोघांनीही खरं बोलावं असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी जोरदार टीका केली आहे. एनपीआय वाईट नाही पण हे सरकार त्याला एनआरसीसोबत जोडणार असल्यानं त्यावर आक्षेप आहे असं 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत चव्हाण म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीच्या मुद्द्यावरुन वादंग सुरु आहे. कुठे विरोधात तर कुठे समर्थनात मोर्चे निघत आहेत. काँग्रेसनंही नागरिकत्व दुरुस्ती कायद्यालाविरोध केला आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाला एक्सक्लूझीव्ह मुलाखत दिली आहे.
चव्हाण म्हणाले, देशाच्या आणि संविधानाच्या इतिहासात नागरिकता देण्याासाठी धर्माचा आधार घेतला आहे. धर्माचा आधार घेतला नाही पाहिजे. विशिष्ट समाजाला म्हणजे मुस्लीम समाजाला जाणूनबाजून वगळला आहे. धर्माचा वापर पहिल्यांदा कायदा करण्यात वापरला गेला आहे. हे दुष्ट बुद्धीने केला गेलं आहे. ढासळती अर्थव्यवस्था, निवडणुकीचा पराभव यातून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी एनआरसीचा वापर केला गेला आहे.
अमित शाह सत्तेचा आणि पदाचा वापर करत असतील तर आपण कोठे दाद मागयचे आहे. किती खोट बोलणार आहे. मोदी थोडेसे खरे बोलले आहे. दोन दिवसात विधेयक पारीत करून निर्णय घेतात. बऱ्याचदा स्थलांतर हे राजकीय संधीसाठी केला जाते. एनपीआरचा आणि एनआरसी चा संबध नाही असे अमित शहा म्हणतात मग, संसदेत का खोट बोलतात, असेही चव्हाण म्हणाले.
नागरिकत्व कायद्याबाबत शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिकेत विरोधाभास दिसत आहे, याला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, एनआरसी विषयी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे.
मात्र महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात एकाच चव्हाणांची वर्णी लागणार आहे का? या प्रश्नावर मात्र चव्हानांनी उत्तर देण टाळल. मंत्रिमंडळासाठी यादी तयार करताना दिल्ली हायकमांडनं पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर फुली मारत अशोक चव्हाणांच्या एन्ट्रीचा मार्ग मोकळा केल्याचं कळतंय. तर पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय. महाराष्ट्रात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी दिल्ली गाठत, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांच्याशी सविस्तर चर्चा केलीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भविष्य
Advertisement