एक्स्प्लोर
अकोल्यातील प्रसिद्ध बिल्डर 15 दिवसांपासून सहकुटुंब बेपत्ता
अकोला : अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह बेपत्ता झाले आहेत. वाघ कुटुंब बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे.
अमित वाघ हे साताऱ्याला सासुरवाडीला गेले होते. मात्र 13 जूनच्या रात्रीपासून कुटुंबीयांसह त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याची माहिती समोर आली आहे. अमित वाघ, त्यांची पत्नी प्रियंका आणि शाश्वत आणि स्पंदन या दोन मुलांचा सातारा पोलिस शोध घेत आहेत.
वाघ कुटुंब अकोल्यातील खडकी इथल्या संतोषनगर परिसरात राहतात. वाघ यांचे अकोल्यातील गोरक्षण रोड, मलकापूर, तुकाराम हॉस्पिटल चौकामध्ये मोठ-मोठी अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. तर काही बांधकामं पूर्णत्वास गेली आहेत.
वाघ कुटुंब अशाप्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे बांधकाम व्यवसायातील स्पर्धा कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
अमित वाघ यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय होता. भागीदारी अडचणीत आल्यामुळे वाघ यांनी स्वतंत्रपणे बांधकाम व्यवसाय उभारण्याचे प्रयत्न केले होते, अशी माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement