एक्स्प्लोर

अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ, गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क, आज पवार जळगावसह धुळे जिल्ह्यात 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आी आहे. आज अजित पवार मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत.

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आी आहे. आज अजित पवार मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवार यांची सुरक्षा वाढवली आहे. 

मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांची अजित पवार घेणार भेट 

अजित  पवार बोलता मालेगावच्या दिशेनं निघाले आहेत. मालेगावमध्ये अजित पवार हे आज माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेणार आहेत. आसिफ शेख मालेगाव मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याची चाचपणी अजित पवार करणार आहेत. अल्पसंख्याक समाज लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) पासून दूर गेल्यानं त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न आजच्या दौऱ्यात राहणार आहे. आसिफ शेख यांच्या भेटीनंतर अजित पवार धुळे आणि अमळनेरच्या दौऱ्यावर आहेत. माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर अजित पवार हे आज त्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीला ( शरद पवार गट ) सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्या भेटीला महत्व आलं आहे. आसिफ शेख हे मालेगाव मध्य मधून उमेदवारी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 
 माजी आमदार आसिफ शेख यांच्या घरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचे चेकिंग करुन पोलिसांनी खात्री देखील केली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर अजित पवार यांची (Ajit Pawar)  जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra)  सुरु आहे. नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अजित पवारांच्या या दौऱ्यात त्यांना धोका असून मालेगाव (Malegaon Visit)  दौऱ्यावेळी काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिली आहे. अजित पवार आज मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना आहे. गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात धोकादायक हालचाली अनेक दहशतवादी संघटनांकडून असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना  देण्यात आला आहे.  जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांची अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अजित पवारांच्या जीवाला धोका; मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घ्या, गुप्तवार्ता विभागाचा अलर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget