अजित पवारांच्या जीवाला धोका; मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घ्या, गुप्तवार्ता विभागाचा अलर्ट
अजित पवार उद्या मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना आहे.
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर अजित पवारांची (Ajit Pawar) जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) सुरु आहे. नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अजित पवारांच्या या दौऱ्यात त्यांना धोका असून मालेगाव (Malegaon Visit) दौऱ्यावेळी काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिली आहे.
अजित पवार उद्या मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना आहे. गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात धोकादायक हालचाली अनेक दहशतवादी संघटनांकडून असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांची अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
संवेदनशील भाग अशी मालेगावची ओळख
राज्यात संवेदनशील भाग अशी मालेगावची ओळख आहे. जातीयवादी दंगलीमुळे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात आहे. किरकोळ कारणांवरुन यापूर्वी मालेगावात जातीय दंगली भडकलेल्या आहेत. मालेगाव तालुका हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या शहरासह तालुक्यात काँग्रेसह समाजवादी पक्षाचे वर्चस्व राहिले आहे.
जनसन्मान यात्रेला मोठा प्रतिसाद
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. मात्र या यात्रेपेक्षा सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती अजित पवारांच्य 'गुलाबी राजकारणा'ची...या दौऱ्यादरम्यान जिथे अजित पवारांची सभा होणार आहे तेथील गुलाबी रंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग अजित पवारांच्य जॅकेटवर, वाहनांवर, मंडपामध्ये सगळीकडे वापरण्यात आला आहे. यात्रेत सहभागी होणारे मंत्री, पदाधिकारी यांच्यासाठी दोन-तीन व्हॅनिटी वाहने गुलाबी रंगाचे आहेत. याशिवाय काही छोटी वाहनेही गुलाबी असून या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह इतर शासकीय योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे.
अजित पवारांच्या गुलाबी राजकारणाची चर्चा
अजित पवारांच्या या गुलाबी राजकारणाची सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे. अजित पवारांच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. अजित पवारांच्या ताफ्यातीली ही वाहने सभास्थळी, सार्वजनिक ठिकाणी फिरविण्यात येणार असून या वाहनांमध्ये एलईडी पडद्याचीही सुविधा आहे. त्याव्दारे योजनांची माहिती देण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून अधिवेशनात जाहीर केलेल्या योजनांची जास्तीजास्त प्रसिध्दी होईल, यासाठी प्रयत्न होत आहे.
हे ही वाचा :
शरद पवारांची यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी