एक्स्प्लोर
अहमदनगरच्या विद्यार्थ्याचा 'इतिहास', परीक्षेसाठी बैलावर सवारी

अहमदनगर : परीक्षा किंवा शाळेत जाण्यासाठी ग्रामीण भागाती विद्यार्थी सर्वसामान्यपणे एसटी, सायकल किंवा पायी जाण्याचा पर्याय निवडतात. अहमदनगरमध्ये मात्र दहावीच्या एका विद्यार्थ्याने परीक्षाकेंद्रावर जाण्यासाठी थेट बैलावर स्वारी केली आहे. अहमदनगरमधील कर्जतच्या निमगाव डाकूतील विद्यार्थ्याने हा अनोखा मार्ग पत्करला आहे. बसने प्रवास करण्यासाठी पैसे नसल्यामुळे विजय काळे या विद्यार्थ्याने बैलावर बसून परीक्षा केंद्र गाठलं. विजयचा इतिहासाचा पेपर होता, मात्र बसच्या प्रवासासाठी 44 रुपये नसल्यानं त्यानं बैलावर बसून 19 किलोमीटरचं अंतर कापलं आणि तो कोरेगावच्या परीक्षाकेंद्रावर पोहोचला. विजयचे पालक मोलमजुरी करत असल्यानं परिस्थिती हलाखीची आहे. सुरुवातीचे काही दिवस पेपरसाठी तो बसने प्रवास करुन केंद्रावर पोहोचला मात्र इतिहासाच्या पेपरला पैसेच नसल्यानं बैलावर बसून त्यानं केंद्र गाठलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















