एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
औरंगाबाद: औरंगाबादच्या बिडकीनमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. निवडणुकांचा राग मनात ठेवून दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांनी आधी लग्नात आणि त्यानंतर गावात येऊन राडा केला. याप्रकरणी दोन्ही गटातील 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
निवडणुका संपल्या तरी त्यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये असलेला राग अद्यापही कमी झालेला नाही. औरंगाबादमध्ये शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी गाडीची काचही फोडण्यात आली. सुरुवातील औरंगाबादमध्ये एका लग्नात दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर गावात परतल्यानंतर पुन्हा दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी तुफान हाणामारीही झाली.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत 14 जणांना ताब्यात घेतलं. या हाणामारीमुळे गावात बराच वेळ तणावाचं वातावरण होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement