एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 डिसेंबर 2019 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 डिसेंबर 2019 | शुक्रवार
- एकनाथ खडसेंनी पुकारलेल्या बंडावर भाजप नेतृत्व नाराज, पुनर्वसनाचा मार्गही खडतर, कार्यकर्त्यांकडून कठोर निर्णय घेण्याची मागणी https://bit.ly/2qMs8y0 , तर एकनाथ खडसेंविरुद्धच्या पुण्यातील खटल्यात आता अंजली दमानियाही तक्रारदार https://bit.ly/2ryWYuD
- पंकजा मुंडेंना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंची टीका तर चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांचं समर्थन https://bit.ly/2t9O0nO
- मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन 26 वर्षीय महिलेची उडी, जाळीवर पडल्यानं जीव वाचला, महिला मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/2PkcKCx
- नागरिकत्व सुधारणा विधेयकाला महाराष्ट्रातूनही विरोध, काँग्रेस नेत्यांकडून अंमलबजावणी न करण्याची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष्य https://bit.ly/2PIqTs1
- मुंबई मेट्रो 3 च्या भुयारीकरणाच्या कामाची वेगवान घोडदौड; कारशेडचा प्रश्न मात्र अनुत्तरित https://bit.ly/34bn2Jq
- संभाजीनगर की औरंगाबाद नावावरुन महापालिकेत भाजप-सेना नगरसेवक समोरासमोर, भाजप उपमहापौरांचा राजीनामा, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ https://bit.ly/35jKTbh
- ‘मेक इन इंडिया’ नव्हे तर ‘रेप इन इंडिया’ राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन भाजप खासदारांचा लोकसभेत गदारोळ, माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार https://bit.ly/2YUfs53
- आंध्रप्रदेशमध्ये बलात्काऱ्यांना 21 दिवसांत फाशी मिळणार, आंध्र प्रदेशच्या विधानसभेत दिशा विधेयक मंजूर https://bit.ly/2RNJVA1
- दिल्लीच्या निर्भया प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टात 18 डिसेंबरला सुनावणी, तातडीनं फाशी देण्याची मागणी तर आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर 17 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी https://bit.ly/2LRV5zR
- इंग्लडमध्ये 364 जागा जिंकत जॉन्सनच्या हुजुर पक्षाला स्पष्ट बहुमत; ब्रेक्झिटचे समर्थन करणारे बोरीस जॉन्सन पुन्हा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी https://bit.ly/35jLh9J
आणखी वाचा























