एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2020 | शुक्रवार*
- सर्व अत्यावश्यक सेवा वगळता मुंबई महानगर प्रदेशसह पुणे-पिंपरी, नागपुरात 31 मार्चपर्यंत लॉक्ड डाऊन, तर मुंबई लोकल आणि बससेवा सुरु राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा तर सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 25 टक्क्यांवर https://bit.ly/3deOE65
- पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द, नववी आणि अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर, कोरोनामुळं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय; तर दहावीचे उर्वरित दोन पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार https://bit.ly/2QzuJoC
- मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण, राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 वर, तर यशस्वी उपचारानंतर पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह पण निगराणीखाली राहणार https://bit.ly/2Qx6VBU
- आयकर रिटर्न, जीएसटी भरण्याची मुदत वाढवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी; तर 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून देण्याची विनंती https://bit.ly/392FTJb
- कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सक्षम, राज्याकडे पुरेसा पैसा, केंद्राला निधी मागण्याची आवश्यकता नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील पत्रकार परिषदेत माहिती https://bit.ly/3beDjRO
- लंडनहून परतलेली गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण, सलग तीन दिवस पार्टीच्या निमित्ताने व्हीआयपींसह शेकडोंच्या संपर्कात https://bit.ly/3dgjgEa
- कोरोनामुळे धूम्रपान करण्यापासून रोखलं म्हणून पोलिसांवर अरेरावी, गुन्हा दाखल; ठाण्यातील जी क्रॉप कंपनीच्या बाहेरील प्रकार https://bit.ly/2xVAdDS
- सात वर्ष, तीन महिने आणि तीन दिवसांनंतर दिल्लीतील निर्भयाला न्याय, चारही नराधम पहाटे साडेपाच वाजता फासावर https://bit.ly/2Umxhrr ; तर आजचा दिवस देशातील सर्व महिलांना समर्पित; निर्भयाच्या आईवडिलांची प्रतिक्रिया https://bit.ly/3deQpAd
- बहुमत चाचणीपूर्वीच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा, भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी, शिवराज सिंह मुख्यमंत्री बनण्याची शक्यता https://bit.ly/2Ws0Tq1
- सोलापुरातील बार्शीचे झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांच्या यादीत, 'ग्लोबल टीचर प्राईझ'ने होणार सन्मान https://bit.ly/33CTNRc
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
नागपूर























