(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 05 ऑगस्ट 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. अयोध्यानगरीत आज आनंदोत्सव, पंतप्रधान मोदींच्या हस्ते दुपारी मंदिराची भूमिपूजन, राम मंदिराच्या नावाने टपाल तिकीटाचं अनावरण होणार
2. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज, प्रभू श्रीरामाचा गजर, जागोजागी रांगोळ्या आणि घरांवर पताका, महाराष्ट्रातही आनंदाचा माहौल
3. सुशांत सिंह, दिशा सालियानची हत्या, राज्यातील एका मंत्र्याला वाचवण्याचाही प्रयत्न, नारायण राणेंचा गंभीर आरोप, तर बदनाम करुन गलिच्छ राजकारण सुरु, आदित्य ठाकरेंचा पलटवार
4. राज्यात 24 तासात सर्वाधिक 12 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त, तर दिवसभरात 7760 नव्या रुग्णांची वाढ, 300 रुग्णांचा मृत्यू
5. कोरोनावरील रशियाची लस पुढच्या महिन्यात बाजारात येणार, चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचा रशियाचा दावा
6. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस क्वॉरन्टाईन सक्तीचं, परिवहन विभागाचा निर्णय, १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांना टेस्ट करावी लागणार, आजपासून एसटी सुटणार
7. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात दृश्यमानता कमी, पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकल वाहतूक बंद
8. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस, भातशेतीला मोठा दिलासा, आंबोलीत दाट धुकं, तर कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहरे
9. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास, आज दुपारी अंत्यसंस्कार
10. लेबनॉन देशाची राजधानी बेरुत स्फोटांनी हादरली, फटाक्यांच्या गोदामात स्फोट, दहा किलोमीटरपर्यंत प्रचंड नुकसान