स्मार्ट बुलेटिन | 23 मे 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्यात काल सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद, एका दिवसात 2940 कोरोनाचे रुग्ण; एकट्या मुंबईत 1751 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
2. जगभरात 21.56 लाख कोरोनामुक्त तर कोरोनाबाधितांचा आकडा 53 लाखांवर, रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर
3. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेणे म्हणजे युजीसी गाईडलाईन्सचं उल्लंघन केल्यासारखं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4. खासगी रुग्णालयांसाठी राज्य सरकारकडून शुल्कदर निश्चित, रुग्णांची लूट थांबवण्यासाठी निर्णय, रुग्णालयातल्या 80 टक्के खाटाही सरकार ताब्यात घेणार
5. मुंबई महापालिकेकडून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी स्वतंत्र नियमावली जाहीर; मॉल्स, मार्केटसह दारुची दुकानं बंदच राहणार
6. एसटीचा मालवाहतुकीच्या क्षेत्रात प्रवेश, प्रवासी वाहतुकीबरोबरच एसटी महामंडळ आता वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूकही करणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
7. धरण उशाला अन् कोरड घशाला; शहापूरमध्ये जीव धोक्यात घालून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, हंडाभर पाण्यासाठी रात्रभर महिलांच्या रांगा
8. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे भीषण अपघात, मजुरांना घेऊन जयपूरहून पश्चिम बंगलला जाणारी बस उलटली, 35 मजूर जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर
9. रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, चीनमधल्या तीन बँकांचे 5000 कोटी रुपये 21 दिवसात देण्याचे लंडनमधील कोर्टाचा आदेश
10. आजारी वडिलांना सायकलने गुरुग्रामवरुन दरभंगा घेऊन जाणाऱ्या मुलीचं डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीकडून कौतुक, ट्वीट करुन इव्हांका ट्रम्प यांच्याकडून ज्योती कुमारीवर स्तुतिसुमनं