एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 21 जून 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. कोरोनाच्या काळात योगाचं खरं महत्त्व जगाला समजलं, मोदींचं संबोधन, घरी राहून कुटुंबीयांसोबत योग करण्याचं देशवासियांना आवाहन 2. आज आंतराष्ट्रीय योग दिवस, योग करा आणि निरोगी राहा, रामदेव बाबांचं आवाहन, हरिद्वारच्या पतंजली योगापीठात मोठा उत्सव 3. आज देशभरात कंकणाकृती सूर्यग्रहण, तब्बल 38 वर्षांनंतर योग, महाराष्ट्रात खंडग्रास स्वरुपात ग्रहण दिसणार, उघड्या डोळ्यांनी ग्रहण न पाहण्याचा सल्ला 4. चीन भारतावर सायबर अटॅक करण्याची शक्यता, 20 लाख जणांचे ईमेल निशाण्यावर असल्याची माहिती, नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन 5. 26/11 हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेत बेड्या, राणाविरोधात भारताकडे भक्कम पुरावे, उज्ज्वल निकम यांची माहिती पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 जून 2020 | रविवार | ABP Majha 6. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास, पंतप्रधान कार्यालयाचं स्पष्टीकरण, भारतीय खोऱ्यात चीन घुसल्यानचं गलवान खोऱ्यात झटापट 7. राज्यातील हजारो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती, अनेक विद्यार्थांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नसल्याची माहिती, शिक्षण खात्यासमोर समस्यांचा डोंगर 8. कोरोना संसर्गावर 103 रुपयांची गोळी प्रभावी, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीचा दावा, 'भारतीय औषध महानियंत्रक' (DCGI) संस्थेकडून औषध उत्पादन आणि वितरणाची परवानगी 9. कोरोनाची मृत्यूसंख्या दाखवण्यात पारदर्शकतेचा अभाव, देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा आरोप, तातडीने लक्ष घालण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी 10. गणेशमूर्तीची उंची कमी करुन आपल्या उत्सवाची उंची वाढवुयात, सार्वजनिक गणेश मंडळांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा नाराआणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















