(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 ऑक्टोबर 2021 गुरुवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 ऑक्टोबर 2021 गुरुवार | ABP Majha
1. राज्यातले 24 जिल्हे आणि 21 महापालिका क्षेत्रात काल एकही कोरोना मृत्यू नाही, विदर्भात फक्त 22 कोरोनाग्रस्तांची नोंद, महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु
2. कोरोना लसींच्या 100 कोटी डोसच्या टप्प्यापासून भारत काही पावलं दूर, विक्रमी कामगिरीच्या सेलिब्रेशनसाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन तयार, पंतप्रधान नरेंद्र मोदीही यात सहभागी होणार
3. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 25 तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम सुरु करणार, राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा, या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असंही स्पष्ट केलं
4. मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या तत्त्वांना तिलांजली, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर अग्रलेखातून 'प्रहार', सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचाही घणाघात, त्यामुळे आता शिवसेना- नारायण राणे यांच्या वादाचा दुसरा अंक सुरु
5. मुंबई उच्च न्यायालयानं जामीन नाकारल्यास आर्यन खानची दिवाळी तुरुंगातच जाणार, काल सत्र न्यायालयानं जामीन फेटाळला
6. परमबीर सिंहांना अटक करणार नाही याची शाश्वती देणार नाही, राज्य सरकारचं उच्च न्यायालयात स्पष्टीकरण, परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाणे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि भ्रष्टाचार संबंधित आरोपांचा फौजदारी गुन्हा दखल करण्यात आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानंच दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केलेला आहे.
7. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब, राज्य शासनाची जीआर काढून घोषणा, गेले दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं, विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकांना लक्षात घेता ही जागा लवकरच भरणार अशी चर्चा होती.
8. दोन लसींच्या 'मिक्स बुस्टर डोस'ला अमेरिकेत मान्यता; मिक्स डोस अधिक सुरक्षित असल्याचा दावा
9. तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा उघड, महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूचं शीर धडावेगळं केलं
10. इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामनाही भारतानं जिंकला, टी 20 क्रिकेट विश्वचषकात भारताचं पारडं जड