एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 17 मार्च 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. देशात कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर, मार्चपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द, अनावश्यक प्रवास टाळण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन
2. खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाची चाचणी होणार, मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना परवानगी देण्याची केंद्र सरकारची तयारी
3. कोरोना संशयिताच्या हातावर यापुढे शिक्का मारला जाणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, रुग्णाची ओळख पटावी यासाठी सरकारची खबरदारी
4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील दुकानं तीन दिवस बंद, किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांचा निर्णय, जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकानं चालू राहणार
5. कॅशद्वारे व्यवहार टाळा, नोटांमधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा सल्ला, डिजिटल व्यवहार करण्याचा आग्रह
6. कोरोनामुळे इटलीत 24 तासांमध्ये 350 हून अधिक लोकांचा मृत्यू, जवळपास 28 हजार लोकांना लागण तर लस शोधल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7. राज्यभरातल्या मंदिरांना कोरोनाचा धसका, सिद्धिविनायक आणि तुळजाभवानीचं दर्शन बंद, पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात शुकशुकाट, वणी गडावरचा चैत्रोत्सव रद्द
8. खासगी कंपन्यांनी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, बीएमसी आयुक्त प्रविण परदेशी यांचे आदेश
9. ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन, पुण्यातील राहत्या घरीत घेतला अखेरचा श्वास
10. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती, राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement