एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 10 मार्च 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले, दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणं, तर देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 46 वर
2. कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री उद्योगाचं 900 कोटींचं नुकसान, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे साडेसहा लाख कोटी बुडाले, औरंगाबादची निवडणूक पुढे ढकलण्याची एमआयएमची मागणी
3. मुंबईच्या कोळीवाड्यात होळीचा उत्साह, पिंपरीत कोरोना व्हायरसची होळी, होळीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
4. ठाकरे सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेकडून शॅडो कॅबिनेट जाहीर, नवी मुंबईतल्या मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा, आदित्य ठाकरेंच्या खात्यांवर अमित ठाकरेंची नजर
5. राज्यसभेचा चौथा उमेदवार महाविकास आघाडी ठरवेल, काँग्रेसकडून राष्ट्रवादीवर कुरघोडीचा प्रयत्न, तर उमेदवार निश्चितीसाठी आज भाजपची बैठक
6. मध्यप्रदेशात राजकीय भूकंप होण्याची चिन्ह, ज्योतिरादित्य शिंदे भाजपाकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता, कमलनाथ सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड
7. येस बँकेचं कर्ज बुडवणारे भाजपचे देणगीदार, आपचा गंभीर आरोप तर राणा कपूर यांच्या तिन्ही मुलींची कार्यालयं सीबीआयकडून सील
8. उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट, विदर्भात 10 ते 12 मार्च दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा
9. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवी देणं महागात पडलं; परभणीच्या पाथरीतील सीएए-एनआरसी विरोधी आंदोलनात भाषण करणाऱ्याला अटक
10. बेळगाव सीमाप्रश्नी तब्बल दीड वर्षांनी 17 मार्चला होणार सुनावणी, ठाकरे सरकारच्या सीमाप्रश्नाला गती देण्यासंबंधी हालचाली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement