(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 ऑगस्ट 2021 | मंगळवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 ऑगस्ट 2021 | मंगळवार | ABP Majha
1. पीएमसी, रुपी बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी, 5 लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना मुदत ठेवीचे पैसे 90 दिवसांत परत मिळणार, अर्थमंत्री सीतारमण यांची घोषणा
2. मराठा, ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक 127वं घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्याची शक्यता, भाजपकडून खासदारांना व्हिप जारी, विरोधकांचाही विधेयकाला पाठिंबा
3. हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल्सना टप्प्याटप्यानं दिलासा मिळणार, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत मंथन, नियमावलीची प्रक्रिया सुरु
4. सोलापूरची निर्बंधांच्या कचाट्यातून सुटका होणार, दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची पालकमंत्री भरणेंची माहिती, पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही निर्बंध कायम ठेवल्यानं व्यापारी संतप्त
5. लशींच्या काळाबाजाराचा पर्दाफाश केल्यानंतर एबीपी माझावर आज नवा गौप्यस्फोट, लशीची ऑनलाईन नोंदणी करणारे सॉफ्टवेअर दीड महिन्यांपासूनच बंद
6. आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी काल दुपारपासून रांगा, मुंबईलगतच्या नालासोपाऱ्यातील परिस्थितीनं लस तुटवड्याचं गंभीर वास्तव अधोरेखित
7. आज हायकोर्टात महत्त्वाच्या दोन सुनावणी; अकरावी सीईटीला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज अंतिम निर्णय अपेक्षित, मेट्रो कारशेडच्या कांजूरमधल्या जागेच्या वादावरही आजपासून अंतिम सुनावणी
8. आगामी 14 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरसकट ‘महाविकास आघाडी’ होणार नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचं वक्तव्य
9. जागतिक तापमानवाढीचा भारताला मोठा धोका, समुद्रपातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता, आयपीसीसीच्या अहवालात इशारा
10. नीरज चोप्राकडून आई-वडिलांना सुवर्ण पदक समर्पित, टोकियोत ऐतिहासिक कामगिरीनंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंचं जंगी स्वागत