एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 10 ऑगस्ट 2019 | शनिवार | एबीपी माझा
देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
- सांगली, कोल्हापुरात पूर ओसरण्यास सुरुवात, कृष्णेची पातळी 57 फुटांवर तर पंचगंगेची 52 फुटांवर, आलमट्टी धरणातून मोठा विसर्ग
- सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ, अन्न-धान्य, स्वच्छ पाणी, औषधांची मोठी गरज
- किमान दोन दिवस पूरग्रस्त असाल तरच मोफत अन्नधान्य, राज्य सरकारच्या अजब जीआरनंतर संताप
- पुरात हातपाय पांढरे पडले तरीही एनडीआएफच्या जवानांकडून युद्ध पातळीवर मदत, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न, वैद्यकीय सेवाही कार्यरत
- आलमट्टी धरणातून 4 लाख 80 हजार क्यूसेक्स वेगानं विसर्ग, येडीयुरप्पांची मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती, आता पाणी ओसरण्याची आशा
- राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली, एमपीएससीचा पेपरही पुढे ढकलला
- राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हंगामी अध्यक्ष आज ठरण्याची शक्यता, गांधी घराण्याबाहेरील नावाची चर्चा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय
- श्वसनाच्या त्रासामुळे अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची एम्सची माहिती, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह भेटीला
- काश्मीर खोऱ्यात आजपासून शाळा सुरु, इंटरनेटवर बंदी कायम, परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा, 370 कलम हटवल्यानंतर चोख बंदोबस्त
- 66व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, हिंदीमध्ये अंधाधून तर मराठीत भोंगा ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, नाळमधील चैत्या ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement