स्मार्ट बुलेटिन | 18 जुलै 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. महाराष्ट्रात 24 तासात 8 हजार 308 नवे कोरोनाबाधित, तर 258 जणांच्या मृत्यूची नोंद, देश आणि राज्यापेक्षा मुंबईचा रिकव्हरी रेट चांगला
2. पुण्यासह नाशिकमध्ये कोरोनाचा कहर, दिवसभरात पुण्यात 1 हजार 900 तर नाशिकमध्ये 588 नवे कोरोनाग्रस्त, संसर्ग रोखण्याचं प्रशासनासमोर आव्हान
3. जगभरात कोरोनाचा हैदोस सुरुच, 24 तासात 2 लाख 36 हजार नवे कोरोबाधित रुग्ण, आतापर्यंत सुमारे सहा लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू
4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी राज्य सरकारची नियमावली, सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई, बकऱ्यांच्या ऑनलाईन खरेदीला मुभा
5. ठाकरे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न नाही, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, तर लघु आणि मध्यम उद्योगांप्रमाणे साखर उद्योगांनाही पॅकेज मिळावं, शाहांकडे मागणी
6. महाराष्ट्रात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधकांना टोला
7. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी भारतात जनआंदोलन उभारलं, संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच वक्तव्य8. लडाखमध्ये सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज एलओसीचा दौरा करणार, बाबा अमरनाथचं दर्शन घेण्याचीही शक्यता
9. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी क्यू-आर कोड असलेला ई-पास बंधनकारक, राज्याच्या मुख्य सचिवांकडून परिपत्रक जारी
10. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या नानावटी रुग्णालयात दाखल, कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु