25th June Headlines: पंतप्रधान मोदी यांचा इजिप्त दौरा, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगलीत सत्कार; आज दिवसभरात
25th June Headlines: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगलीत आज भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज रिंगण पार पडणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे.
25th June Headlines: आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पंतप्रधान मोदी हे इजिप्त दौऱ्यावर आहेत. काही महत्त्वाते करार होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगलीत आज भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज रिंगण पार पडणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे.
पालखी सोहळा
- संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजवरून निघाल्यावर माळीनगर येथे सकाळी पहिले उभे रिंगण पार पडणार आहे. उभे रिंगण संपन्न झाल्यावर पालखी बोरगावच्या दिशेने प्रस्थान ठेवणार असून बोरगाव येथे तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
- संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी माळशिरसहून पहाटे प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर खुडूस फाटा येथे सकाळी दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे. रिंगण सोहळा संपन्न झाल्यावर माउलींची पालखी वेळापूरच्या दिशेने पस्थान ठेवणार असून पालखीचा वेळापूर येथे मुक्काम असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या इजिप्त दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज भारत-इजिप्त दरम्यान काही सामंजस्य करार होणार आहेत. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तमधील काही ठिकाणी भेट देणार आहेत.
सांगली
- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगलीत आज भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन करणार आहे. सांगतील काँग्रेस पक्षाने कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
पुणे
- अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची आज निवड होणार आहे.
कोल्हापूर
- छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत कोल्हापूरात सद्भावना रॅली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याने सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे -
ओवळा-माजिवडा परिसरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत.
नांदेड
- शासन आपल्या दारी या योजनेसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज नांदेडमध्ये उपस्थितीत राहणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
चंद्रपूर
- चंद्रपूरचे मनसे नेते रमेश राजुरकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
सातारा
- संजय राऊत हे पाटण तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्तांची भेट आणि विकास कामाचे उद्धाटन करणार आहेत. त्याशिवाय सायंकाळी त्यांची सभादेखील होणार आहे.
नागपूर
- मोदी@नाईन भाजपच्या या प्रचार मोहिमेंतर्गत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समाजातील प्रबुद्ध नागरिक यांच्यासोबत संवाद आहे.