![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eknath Shinde Shivsena : शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती होऊ द्या असं राज ठाकरे म्हणाले होते - शिंदे
Eknath Shinde Shivsena : शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती होऊ द्या असं राज ठाकरे म्हणाले होते - शिंदे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा-मुस्लिम आणि दलित यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे, मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमाणी आणि आनंदराज आंबेडकर एकत्रित आले होते. दरम्यान मनोज जरांगे रविवारी (दि.3) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणार आहेत. यापूर्वी मनोज जरांगे यांच्याकडून अनेक मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांनी बैठक घेऊन एकच उमेदवार ठरवावा, अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांना जवळ केल्यानंतर भाजपच्या काही प्रवक्त्यांनी आणि समर्थकांनी मनोज जरांगे मुस्लिम धार्जिणे आहेत, अशी टीका केली होती. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हालाच हिंदूत्व कळतं का? आम्ही कट्टर हिंदू आहोत, आम्ही छत्रपतींचं हिंदूत्व मानतो मनोज जरांगे म्हणाले, मला मुस्लिम धार्जिणे म्हणणारे स्वत: मुस्लिम धार्जिणे नाहीत का? ट्रोल करणारे आणि त्यांचे बाप ते मु्स्लिम धार्जिणे नाहीत का? मोदी साहेब नवाब शरिफच्या मुलीच्या लग्नाला कशाला गेले होते पाकिस्तानला? बांगल्यादेशच्या पंतप्रधान पळून भारतात आल्या. त्यांना मोदी साहेबांनी सांभाळलं. त्यांची आत्या होती का? ते मुस्लिम धार्जिणे नाहीत का? पाशा पटेल कोण आहे? ते मुसलमान यांना चालतात. आम्ही मुस्लिमांना भेटलो की मला जातीवाद म्हणतात. नवाब मलिक, हसन मुश्रीफ कोण आहेत. तुम्ही दर्ग्यात जातात. त्यावेळी तुम्हाला चालतं. आम्ही गेलो की, चालत नाही. तुम्हालाच हिंदूत्व कळतं का? आम्ही कट्टर हिंदू आहोत. आम्ही छत्रपतींचं हिंदूत्व मानतो.
![Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/0b087b9196d49b21c9cfbeaa658483991735885182858718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/14531a3ac11dc0861e3d748bf0cf210f1735879547736718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/9dab373cbc174da3acb11fb942cbc4b01735876823637718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/ce7ccb49dda46770c40e6e93592ef65e1735870580466718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Walmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/1e45598b37d39582c3db2f2b2e60d4291735870125927718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)