एक्स्प्लोर
रायगड : माणगाव कंपनीत सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू, 16 जण गंभीर
माणगावमधील विळे भागाड औद्योगिक वसाहतीतील क्रिप्टझो इंजिनीअरिंग कंपनीत बॉयलर सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 4 जण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.

रायगड : माणगाव येथील विळे भागाड एमआयडीसीतील क्रीपझो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काल (15 नोव्हेंबर)संध्याकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यामध्ये आसपासच्या गावातील राहणारी 18 मुले गंभीर जखमी झाली. त्यांना तत्काळ ऐरोली येथील नॅशनल बर्न्स रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यापैकी 2 तरुणांचा उपचारावेळी मृत्यू झाला. 4 तरुण अजूनही आयसीयुमध्ये आहेत. तर इतर भाजलेले 11 तरुण हे जनरल वोर्डमध्ये उपचार घेत आहेत.
आशिष, शुभम जाधव, सुनील रेगोटे, किशोर कारगे, राकेश हळदे, कैलास पडावे, चेतन कारगे, राजेश जाधव, प्रसाद नेमाणे, सुनील पाटील, रजत जाधव, मयुर तामणकर, आकाश रक्ते, प्रमोद म्हस्के, वैभव पवार, रुपेश मानकर, सुरेश मांडे अशी जखमींची नावं आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशनम दलाचे जवान तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्फोट नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र, या स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संध्याकाळच्या सुमारास विशिष्ट चाचणी घेत असताना बॉयलरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रात्रीच नॅशनल बर्न्स रुग्णालयात गावकऱ्यांनी गर्दी केली. अपघात झाल्यापासून कंपनीचा एकही माणूस रुग्णालयात न आल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. या तरुणांना कंपनी आणि सरकारकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या -
हुबळी रेल्वेस्टेशनवर स्फोट, स्फोटकांच्या पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
