भंडाऱ्यात 174 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
जेवणानंतर मळमळ होणे, डोकेदुखी, जुलाब, उलट्यांचा त्रास विद्यार्थ्यांना जाणवू लागला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भंडारा : भंडारा शहरात जेवणातून 174 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. आदिवासी विभागीय क्रीटा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी भंडारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पूर्व विदर्भातील अनुदानित आणि विनाअनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा भंडारा येथील शिवाजी क्रीडा संकुलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. जवळपास 2500 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं. त्यावेळी अन्न आणि पाण्यातून जवळपास 174 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.
जेवणानंतर मळमळ होणे, डोकेदुखी, जुलाब, उलट्यांचा त्रास विद्यार्थ्यांना जाणवू लागला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उपचारानंतर 97 विद्यार्थ्यांनी प्रकृती स्थिर असून त्यांना क्रीडा संकुलात विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे. तर 19 विद्यार्थ्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.
या संपूर्ण घटनेसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजक जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आयोजकांनी याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.