एक्स्प्लोर

Love Jihad: लव्ह जिहादच्या विरोधात लातुरात 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'

Latur News : लातूर शहरातील गंज गोलाई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे.

Latur News : लातूरमध्ये आज 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला आहे. लव्ह जिहादच्या (Love Jihad) विरोधात या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात अनुई जिल्ह्यात सातत्याने 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' काढण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज लातुरात हा मोर्चा निघाला होता, ज्यात विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता. 

लातूर शहरातील गंज गोलाई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आहे. गंज गोलाई हनुमान चौक, गांधी चौक, टाऊन हॉल, अशोक हॉटेल मार्गानेपुढे जात या मोर्च्याची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता होणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने व्यापारी, शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता. व्यापाऱ्यांनी मोर्चा मार्गातील दुकाने बंद ठेवून मोर्च्यात सहभाग घेतला होता.  यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

'आधी मोर्चा मग व्यापार' असे घोष वाक्य वापरून लातूर शहरातील व्यापाऱ्यांना मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. लातूर शहरासह ग्रामीण भागात सतत लव्ह जिहादचे प्रकार वाढत असून, हे थांबवायचे असतील तर जन जागृती आवश्यक आहे. याची सुरुवात स्वतःपासून, स्वताच्या दुकान पासून, स्वताच्या घरा पासून करावी असे आवाहन करत या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्या या तीन प्रमुख मुद्द्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात होता. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त... 

लातूर शहरात आज लव्ह जिहादच्या विरोधात 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आल्याने, पोलिसांकडून यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून. मोर्च्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. तर मुख्य चौक आणि रस्त्यात लागणाऱ्या विशेष ठिकाणी देखील पोलिसांचा खास बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर मोर्च्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः मोर्च्याच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

महिलांचाही उपस्थिती...

लव्ह जिहादच्या विरोधात लातूर शहरात काढण्यात आलेल्या आजच्या  'हिंदू जनआक्रोश मोर्चा'त महिला आणि तरुणांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. हातात भगवा झेंडा घेऊन अनेक महिला या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. तर लव्ह जिहादच्या विरोधात घोषणा असलेले बोर्ड देखील यावेळी महिलांच्या हातात पाहायला मिळाले. 

DCM On Love JIhad :लव्ह जिहादविरोधी कायद्याचा राज्य सरकार अभ्यास करतंय- फडणवीस

महत्त्वाच्या बातम्या

Abhimanyu Pawar : 15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget