Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात (Ajara tehsil) टस्करचा धुमाकूळ (Tusker menace) सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले.
Tusker menace : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात (Ajara tehsil) टस्करचा धुमाकूळ (Tusker menace) सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले. मुसळधार पावसामुळे आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास खोळंबली. टस्कर बाजूला होईपर्यंत गोवा, आंबोली येथून येणारी वाहने अडकून पडली होती.
दोन दिवसांपूर्वी टस्कराने शेतकरी महादेव पेडणेकर यांची पाण्याची पाईपलाइन आणि अनेक गुंठे शेतजमीन उद्ध्वस्त केली होती. गवसे गावात शुक्रवारी रात्री स्थानिक ग्रामस्थ रेमेट फर्नांडिस यांच्या चारचाकी व दोन दुचाकी हत्तीने (Tusker menace) पलटी केल्या.
फर्नांडिस म्हणाले की, “टस्कर आमच्या घराच्या कंपाऊंड भिंतीतून आत शिरला आणि प्रथम कारशेड पाडले. त्यानंतर ते पलटी होऊन शेडमधील कार व दोन दुचाकींचे नुकसान झाले. शुक्रवारी रात्री 11 ते पहाटे 2 च्या दरम्यान हा प्रकार घडला. ऊस व भात पिकांचेही नुकसान झाले आहे. आम्ही आमच्या घरातून बाहेर पडण्याचा धोका पत्करला नाही.”
वनविभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी
नंतर हा टस्कर आजरा-आंबोली रस्त्यावर उभा राहिला आणि आंबोली आणि गोव्याहून येणाऱ्या लोकांना हत्ती बाजूला होईपर्यंत सुमारे दोन तास थांबावे लागले. दरम्यान, या टस्करामुळे स्थानिक ग्रामस्थ घाबरले असून वनविभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापूरमधील स्वप्नाला अवघ्या अडीच वर्षात सुरुंग!
- Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका सुद्धा लांबणीवर, राज्य सरकारचा आदेश
- Vijaydurg Fort : पन्हाळा, विशाळगडानंतर आता विजयदुर्गची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर
- Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदी लागली उतरणीला, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला
- Shivsena : 'शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स, राहिले ते सोनं' म्हणणारे खासदार मंडलिक शिंदे गटात?