एक्स्प्लोर

Shivsena : 'शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स, राहिले ते सोनं' म्हणणारे खासदार मंडलिक शिंदे गटात?

Maharashtra Politics Sanjay Mandlik : एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात रोष व्यक्त करणारे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे देखील शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics Sanjay Mandlik : एकनाथ शिंदे गटाविरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे पहिले खासदार संजय मंडलिक हे देखील एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. खासदार संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार आहेत. संजय मंडलिक यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याचा आग्रह धरू शकतात. याच आग्रहाचे कारण देत आपण शिंदे गटात जात असल्याचे खासदार मंडलिक शिंदे गटात जाणार असल्याची दाट शक्यता आहे. खासदार धैर्यशील मानेदेखील उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करू शकतात, असे म्हटले जात आहे. 

काही दिवसांपूर्वी खासदार मंडलिक यांनी शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेले अस्सल सोनंच असं वक्तव्य त्यांनी केले होते. जवळपास तीन वर्षांपूर्वी संजय मंडलिक यांनी  कोल्हापूरमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन खासदार आहेत. या दोन्ही खासदारांनी पक्ष सोडणार नसल्याचे म्हटले होते. खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज दुपारी कागल तालुक्यातील हमीदवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. 

कोल्हापूरमधून राजेंद्र पाटील,  आमदार प्रकाश आबिटकर आणि  शिवसेनेचे नेते नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मंडलिक आणि माने या दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट केले होते. 

बैठकांना दांडी

राष्ट्रपती निवडणुकीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीसाठी संजय मंडलिक अनुपस्थित होते. मात्र, आपण पूर्वपरवानगीने हजर होतो असेही त्यांनी सांगितले. तर, धैर्यशील माने यांनी मातोश्रीवरील बैठकीत हजेरी लावली. तर, कोल्हापुरात झालेल्या शिवसेना मेळाव्यात अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर या दोन्ही खासदारांबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. 

संजय मंडलिक शिंदे गटात गेल्यास शिंदे गट आणि भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते. धनंजय महाडिक हे सध्या भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. त्याशिवाय त्यांना इतरांकडून मोठी साथ मिळू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
आंदोलकांवर कारवाई करुन सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवायची विरोधकांचा आदर ठेवा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Sonam Wangchuk: गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
गोकुळ कर्मचारी संघटनेचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा; आंदोलन का केलं? जय श्रीरामच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळ कार्यालयात गोंधळ
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Embed widget