Kolhapur municipal corporation elections 2022 : एकमेव हरकत निकालात, कोल्हापूर मनपाच्या सर्व प्रभागातील आरक्षणावर शिक्कामोर्तब
कोल्हापूर (Kolhapur municipal corporation elections 2022 ) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 31 मार्च रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. आरक्षणावर एकमेव हरकत आली होती.
Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 31 मार्च रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. या आरक्षणावर आलेली एकमेव हरकतीवर पालिका प्रशासनाने निकालात काढल्याने मार्ग मोकळा झाला. निश्चित झालेल्या आरक्षणानुसार 92 पैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 79 जागा आहेत. दुसरीकडे मतदार याद्यांचे काम महापालिकेतून हाती घेण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रथमच तीन सदस्यीय पद्धतीने होईल. कोल्हापूर शहरातील 31 प्रभागातील 92 नगरसेवकांसाठी ३१ मे रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावर 6 जूनपर्यंत हरकत घेण्याची मुदत होती. या कालावधीमध्ये एकमेव हरकत दाखल झाली होती. अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या प्रभागातील तिन्ही जागा अनुसूचितसाठी आरक्षित करण्यासाठी हरकत दाखल करण्यात आली होती. मात्र, नियमाने असे होत नसल्याने हरकत निकाली निघाली.
दरम्यान, शहरात ओबीसी लोकसंख्येच्या सर्वेक्षणाचे सुरु असलेलं काम पूर्ण झालं आहे. त्याचा अहवाल ऑनलाईन अपलोड झाला आहे. आज तो अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.
असे आहेत आरक्षित प्रभाग
अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग क्रमांक - 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ, 30 अ,
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक - 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ, 18 अ
सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक - 1 ब, 2 ब, 3 अ, 4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब, 8 अ, 8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13 ब, 14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 अ, 22 ब, 23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ, 25 ब, 26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ
अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक - 2 अ
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक - 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाले आहे. सोमवारी त्या त्या ठिकाणी प्रभाग आरक्षण सोडती काढण्यात आल्या. या आरक्षण सोडतीनंतर 9 नगरपालिकांमधील 235 जागांपैकी 138 जागांवर महिलाराज असेल. प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आलेल्या नगरपालिकांमध्ये इचलकरंजी (महापालिका झाली असूनही नगर पालिका आरक्षण), मुरगुड, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड, पेठवडगाव, मलकापूर, पन्हाळा, कागल समावेश आहे.
प्रभाग रचना निश्चित झाल्याने आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबत सर्वसाधारण अंदाज आला होता. त्यामुळे नागरिकांचा आरक्षण सोडतीवेळी निरुत्साह दिसून आला. आरक्षण सोडतीवर 15 ते 21 जून या कालावधीमध्ये हरकती स्वीकारल्या जातील. 24 जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायानंतर विभागीय आयुक्तांना हरकती सादर केल्या जातील. तर 29 जून रोजी विभागीय आयुक्तांकडून आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं जाईल. याबाबत अंतिम माहिती 1 जुलैला प्रसिद्ध होईल.
कोणत्या नगरपालिकेत कसं आरक्षण असेल ?
अलीकडेच महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेत 64 पैकी 32 जागांवर महिलाराज असेल. जयसिंगपूर नगरपालिकेत 26 पैकी 13 जागांवर महिला आरक्षित झाल्या आहेत. मुरगुड, मलकापूर, पेठवडगाव, कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये 20 पैकी 10 जागा महिलांसाठी असतील. कागल नगरपालिकेत 23 पैकी 11 जागांवर महिला असतील. गडहिंग्लजमध्ये 22 पैकी 11 जागांवर महिला असतील. गडहिंग्लज अनुसुचित जातीच्या महिला राखीव प्रवर्गाचाही समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या