MP Dhananjay Mahadik : खासदार धनंजय महाडिकांचे इन्स्टा अकाउंट हॅक; रिकव्हर करण्यासाठी प्रक्रिया सुरु
भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे इन्स्टा अकाउंट हॅक करण्यात आले आहे. रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अकाउंट हॅक केल्याचे लक्षात येताच ते रिकव्हर करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
MP Dhananjay Mahadik : भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे इन्स्टा अकाउंट हॅक करण्यात आले आहे. रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अकाउंट हॅक केल्याचे लक्षात येताच ते रिकव्हर करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. उकाउंट हॅक झाल्याचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सांगण्यात आले. अकाउंट हॅक करण्यात आल्यानंतर धनंजय महाडिक यांचा बायोमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे महाडिक यांचा कोणताही बायो त्यामध्ये दिसून येत नाही. हॅक केल्यानंतर Dhananjay Crypto Enterpreneur असे बायोमध्ये लिहिण्यात आलं आहे.
तुमचा रस्ताही कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा; धनंजय महाडिकांचा कन्नडिगांना इशारा
Maharashtra Karnataka Border Dispute : कानडी संघटनांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर संतापाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला. भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी तुमचा रस्ताही कोल्हापुरातून जातो, हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी ते दिल्लीत आहेत. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.
धनंजय महाडिक म्हणाले, मी कोल्हापूरमध्ये स्थायिक असल्याने कर्नाटकची हद्द 10 किमीवर सुरु होते. गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्याची घटना घडली त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. वाद न्यायालयात प्रलंबित असताना अशी रस्त्यावरची गुंडगिरी, दादागिरी तेथील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शोभत नाही. जशी तुम्ही महाराष्ट्रातील वाहनांना इजा करता ते बघता कर्नाटकला देशभरात महाराष्ट्रातून जाण्याशिवाय पर्याय नाही हे यापूर्वी त्यांनी पाहिलं आहे. त्यांच्या वाहनाना कोल्हापूर, सोलापुरातून जावं लागतं याची जाणीव त्यांना असली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकाराची दर्पोक्ती करत असतील, तर महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. यावर तोडगा निघायला पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या